पुणे – श्री सुभाष शुगर, शिऊर कारखाना ऊस उत्पादकांसाठी प्रोत्साहन योजना राबवणार : कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख

पुणे : शिऊर साखर कारखाना लिमिटेड आणि हडसणीतील श्री सुभाष शुगर प्रायव्हेट लिमिटेडतर्फे उत्पादकांसाठी ऊस प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली आहे. श्री सुभाष शुगर प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख यांनी ही माहिती दिली. सध्या दोन्ही कारखान्यांत प्रतिदिन ८ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप सुरू आहे. दोन्ही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रांतील सर्व शेतकऱ्यांचा ऊस १५ मार्चपर्यंत नेण्यात येईल असे ते म्हणाले.

ऊस प्रोत्साहन योजनेबाबत चेअरमन सुभाषराव लालासाहेब देशमुख यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, दोन्ही कारखाने शेतकरी हितासाठी व समृद्धीसाठी सदैव प्रयत्नशील असून, गाळपास विलंब होत असल्याने सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रोत्साहनपर योजना देखील कारखान्याने सुरू केली आहे. कार्यक्षेत्रातील कळमनुरी, हदगाव, हिमायतनगर व उमरखेड या भागांतील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाचे नियोजन केले आहे. १५ फेब्रुवारीपर्यंतच्या उसाला २५०० रुपये आणि प्रोत्साहनपर ५० रुपये प्रतीटन अशी २५५० रुपये पहिली उचल दिली जाईल. तशाच पद्धतीने १६ ते २८ फेब्रुवारीसाठी २५०० ते १०० रुपये आणि एक ते पंधरा मार्च या कालावधीतील उसाला २५०० व प्रोत्साहनपर १५० रुपये असे दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर दोनशे रुपये मिळतील. जास्तीत जास्त उत्पादकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here