हंगाम २०२४-२५ मध्ये इथेनॉल पुरवठ्यासाठी ओएमसींना दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत मिळाले आवश्यकतेपेक्षा जास्त प्रस्ताव

नवी दिल्ली : अलिकडेच, इथेनॉल पुरवठा वर्ष (इएसवाय) २०२४-२५ च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीसाठी (सायकल ३) इंधन विपणन कंपन्यांनी (OMCs) सुमारे १२४ कोटी लिटर निर्जल इथेनॉल पुरवण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. हे इथेनॉल सी-हेवी मोलॅसेस (सीएचएम) आणि एफसीआयच्या अतिरिक्त तांदळापासून मिळवले जातील. देशभरातील उत्पादकांनी १६४ कोटी लिटरपेक्षा जास्त ऑफर्स सादर केल्या होत्या. त्यामुळे आवश्यकतेपेक्षा खुपच जास्त ऑफर्स मिळाल्याचे दिसून आले आहे.

याबाबतच्या अहवालांनुसार, एफसीआय तांदळापासून १५९ कोटी लिटर आणि सी हेवी मोलॅसेसपासून ५ कोटी लिटर इथेनॉल मिळेल. दुसऱ्या तिमाहीत सुमारे ८६ कोटी लिटरच्या ऑफर मिळाल्या आहेत, तर तिसऱ्या तिमाहीत सुमारे ७७ कोटी लिटरच्या ऑफर मिळाल्या आहेत. अलीकडेच, धान्य-आधारित इथेनॉल उत्पादकांना मोठा दिलासा देण्यासाठी, सरकारने खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत (ओएमएसएस) एफसीआय तांदळाची राखीव किंमत ५५० रुपये प्रती क्विंटलने कमी करून २,२५० रुपये केली आहे. यामुळे २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठण्यास मदत होईल. सरकारने सी हेवी मोलॅसेसची किंमतही प्रती लिटर ५७.९७ रुपये केली आहे. पूर्वी सीएचएमची किंमत ५६.२८ रुपये होती. यापूर्वी, चालू इएसवाय २०२४-२५ (चक्र – एक आणि चक्र – दोन) मध्ये एकूण सुमारे ९३० कोटी लिटरचे वाटप करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here