‘सातारा भूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कृष्णा कारखान्यावर संचालकांतर्फे डॉ. सुरेश भोसले यांचा सत्कार

सातारा : येथील रा. ना. गोडबोले ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा यंदाचा सातारा भूषण पुरस्कार यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांना जाहीर झाला. त्याबद्दल कृष्णा कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष डॉ. भोसले यांचा सत्कार केला. कृष्णा कारखाना कार्यस्थळावर उपाध्यक्ष जगदीश जगताप व संचालक मंडळाने डॉ. भोसले यांचा सत्कार केला.

डॉ. भोसले यांनी सहकार, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे. कृष्णा परिवारातील सर्वच सदस्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट असून, या पुरस्कारामुळे सर्वांची मान उंचावली आहे, असे गौरवोद्गार उपाध्यक्ष जगताप यांनी काढले. यावेळी संचालक लिंबाजी पाटील, जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासाहेब शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, दत्तात्रय देसाई, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, सी. एन. देशपांडे, पंडित पाटील, मनोज पाटील, वैभव जाखले आदीं उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here