धाराशिव : नॅचरल शुगरच्या प्रेसमड व नेपियर डायजेस्टरमधून उत्पादीत होणाऱ्या स्लरींपासून ‘फर्मटेड ऑरगॅनिक मॅन्युअर’ (एफओएम) या सेंद्रिय खताची निर्मिती सुरू केली आहे. आरसीएफ कंपनीमार्फत ‘पीएम- प्रणाम’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात यापुढे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खत कंपन्यांना सेंद्रिय खत शेतकऱ्यांना पुरवण्याची सक्ती केली असल्याने त्याचाच एक भाग म्हणून नॅचरलचे उत्पादित ‘एफओएम’ खत आम्ही आरसीएफ कंपनीस करार करून योग्य व माफक दरात पुरवण्याचा संकल्प केला आणि तो पूर्ततेस नेला, असे प्रतिपादन नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केले. एफओएम विक्री प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
‘आरसीएफ’चे धाराशिव आणि लातूर जिल्ह्याचे वरिष्ठ विपणन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या खतांचे वितरण राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर (आरसीएफ) या कंपनीस करण्यास प्रारंभ नुकताच करण्यात आला. आरसीएफ कंपनीचे धाराशिवचे वरिष्ठ विपनण अधिकारी गणेश खाडे यांनी रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खतांचा वापर करून जमिनीचा पोत वाढला नाही तरी टिकवून ठेवण्यासाठी तरी सेंद्रिय खत वापर करण्याचे आवाहन केले. कारखान्याचे संचालक कृषिभूषण पांडुरंग आवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. एन. साई मल्टिस्टेटचे उपाध्यक्ष किशोर डाळे यांनी आभार मानले.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.