सांगली – ‘सोनहिरा’चे ७ लाख ९५ हजार ७१० टन गाळप : अध्यक्ष मोहनराव कदम यांची

सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामात आजअखेर ७ लाख ९५ हजार ७१० टन ऊस गाळप झाले आहे. ७ लाख १० हजार ४८० साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे, अशी माहिती अध्यक्ष, माजी आमदार मोहनराव कदम यांनी दिली. अध्यक्ष कदम म्हणाले, सोनहिरा साखर कारखान्याचा २५ वा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. चालू गळीत हंगामात कारखान्याने १४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आज गळीत हंगामाचा ८६ वा दिवस असून आजअखेर कारखान्याने ७ लाख ९५ हजार ७१० टन उसाचे गाळप केले असून ७ लाख १० हजार ४८० साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. १२.५२ टक्के सरासरी साखर उतारा आहे.

ते म्हणाले, कारखान्याची प्रतिदिन ९ हजार ५०० टन गाळपक्षमता बाढविण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या प्रतिदिन ९ हजार ८८५ टन उसाचे गाळप सुरू आहे. कारखान्याचे सहवीज निर्मिती, आसवणी व इथेनॉल आदी उपपदार्थ निर्मिती प्रकल्पही पूर्ण क्षमतेने सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार शेतकरीहित समोर ठेवून कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. कारखान्याने सुरवातीपासून प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत गरुड भरारी घेतली आहे. याआधीच सर्वाधिक ऊसदर देणारा साखर कारखाना म्हणून ‘सोनहिरा’ने लौकिक मिळवला आहे,” असे अध्यक्ष मोहनराव कदम यांनी सांगितले.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here