सांगली : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठीच्या कार्यकारी संचालक पॅनेलवर क्रांती साखर कारखान्याचे चिफ केमिस्ट किरण पाटील यांची महाराष्ट्रामध्ये द्वितीय क्रमांकाने निवड झाली. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी ५० कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनेल तयार करण्यासाठी १८ एप्रिल २०२२ रोजी अध्यादेश काढण्यात आला. त्यानुसार राज्याच्या साखर आयुक्तालयाकडून ३१ मे २०२२ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. याआधारे कार्यकारी संचालकांची परीक्षा प्रथमच पूर्व, लेखी व मौखिक चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये घेण्याचा निर्णय करण्यात आला.
पहिल्या टप्यातील चाचणी परीक्षा ५ एप्रिल २०२४, दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षा ४ मे २०२४, तर लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती १९ व २२ जुलै २०२४ रोजी घेण्यात आल्या. त्यानंतर ५० कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनेल १० तारखेला घोषित करण्यात आले. बुधगाव येथील किरण पाटील यांची कार्यकारी संचालक पॅनेलवर महाराष्ट्रामध्ये द्वितीय क्रमांकाने निवड झाली. ते सध्या येथील क्रांतिअग्रणी साखर कारखान्यात चिफ केमिस्ट आहेत. अध्यक्ष शरद लाड यांनी अभिनंदन केले.