पुणे : विघ्नहर साखर कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरू, सोमवारी अर्जाची छाननी

पुणे : ग्रामीण भागागातील सहकाराच्या निवडणुकांचा हंगाम सुरू झाला असून, जुन्नर येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी (ता. १०) जाहीर झाला आहे. इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास प्रारंभ झाला असून, गेल्या दोन दिवसांत ८३ अर्जाची विक्री झाली असून, विविध अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी (ता. १४) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी पहिल्याच दिवशी उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदार संघाच्या शिरोली बुद्रुक गटातून अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.

अर्जाची छाननी सोमवारी (ता. १७) होणार आहे. माघारीची मुदत ४ मार्चपर्यंत असून ५ मार्चला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. मतदान १५ मार्चला सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत असून, मतमोजणी १६ मार्चला होणार आहे. विघ्नहर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या मंडळाच्या एकूण २१ जागा आहेत. यात उत्पादक सभासद मतदार संघाच्या जुन्नर, शिरोली बुद्रुक, पिंपळवंडी व घोडेगाव गटातून प्रत्येकी तीन तर ओतूर गटातून चार, असे एकूण १६ संचालक तसेच अनुसूचित जाती /जमाती एक प्रतिनिधी, महिला राखीव प्रतिनिधी

दोन, इतर मागासवर्गीय एक प्रतिनिधी, भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गातील एक प्रतिनिधी अशा एकूण २१ संचालकांच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. दाखल झालेल्या अर्जामध्ये उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदार संघांच्या शिरोली बुद्रुक गटातून जालिंदर ढोमसे, पिंपळवंडीतून संभाजी पोखरकर, धनंजय लेंडे, संजय भुजबळ व इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदार संघातून विजयकुमार आहेर, नीलेश भुजबळ, भगवान घोलप यांनी अर्ज दाखल केले. तर शेतकरी संघटनेचे अंबादास हांडे यांनी उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदार संघांच्या पिंपळवंडी गटातून अर्ज दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here