हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
जिल्हा मध्यवर्ती बँकेने 24 कोटी रुपयांच्या थकीत कर्जापोटी निनाईदेवी सहकारी कारखान्याच्या तारण असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेचा प्रतीकात्मक ताबा घेतला. सिक्युरिटायझेन अॅक्टनुसार ही कारवाई करण्यात आली.
जिल्हा बँकेने निनाईदेवी साखर कारखान्याला स्वभांडवलातून आठ कोटी 70 लाख रुपये कर्ज दिले होते. या कर्जासाठी कारखाना कार्यस्थळी तसेच नउ हेक्टर गायरान चमीन, त्यावरील गोदाम आणि मशीनरी तारण दिली होती. राज्य बँकेच्या सहभाग योजनेतुन जिल्हा बॅकेने कारखान्याला 5.56 कोटी रु. कर्ज दिले होते. सद्यस्थितीत कारखान्याकडे 24 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे.
कारखान्याच्या 25 संचालकांनाही नोटीस दिली होती. थकीत 24 कोटी आणि जानेवारी 2018 पासूनचे व्याज अशी रक्कम नोटिसीनंतर साठ दिवसांच्या आत जमा करण्याचे बजावले होते. मात्र दोन महिन्यात थकीत रक्कम देणे संबंधितांना शक्य झाले नाही. त्यामुळे जिल्हा बेँकेने कारखान्याची तारण असलेली स्थावर व जंगम मालमत्ता याचा ताबा घेतला.