बेळगाव : कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यातर्फे कृत्रिम बुद्धीमत्ता अंतर्गत ऊस पीक वाढीसाठी कोगनोळी येथे १९ रोजी चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. कृषी विज्ञान केंद्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे प्रमुख डॉ. तुषार जाधव मार्गदर्शन करणार आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे नुकताच बारामती येथील कृषी प्रदर्शनात ऊस उत्पादनाचा प्रयोग दाखविण्यात आला होता. त्याची माहिती बारामती कृषी विज्ञान केंद्राकडून वेगवेगळ्या ठिकाणी सादर करण्यात येणार वीरकुमार पाटील वाढदिवस गौरव समिती या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत. कोगनोळीसह परिसरातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन बाळासो प्रतिष्ठान व विविधोद्देशीय ग्रामीण प्राथमिक सहकार संघातर्फे करण्यात आले आहे.