नवी दिल्ली : केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, शेतकरी एकात्मिक शेतीच्या माध्यमातून अधिक नफा कमवू शकतात. शनिवारी दिल्लीतील पुसा कृषी विज्ञान मेळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, विकसित भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प आहे. शेतीमध्ये विकास केल्याशिवाय विकसित भारत साध्य होऊ शकत नाही. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासासाठी अनेक ठोस पावले उचलली जात आहेत. आणि त्यापैकी एक किसान मेळा आहे. ते म्हणाले, भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) अनेक पिकांसाठी चांगल्या दर्जाचे बियाणे तयार करत असून शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे.
मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, एकात्मिक शेती कशी करता येईल? एकाच जमिनीत शेतकरी अनेक पिके कशी पेरू शकतात जेणेकरून अधिक नफा मिळवू शकतील. एका एकर शेतीतून अनेक प्रकारची कामे करून शेतकरी अधिक नफा कमवू शकतात. यासाठी देशभरातील शेतकरी येथे येतील आणि अनेक प्रकारचे प्रयोग पाहतील. येथे प्रगत बियाणे देखील उपलब्ध आहेत. स्टार्ट-अप्स देखील येथे आले आहेत. ते म्हणाले, आमचा प्रयत्न आहे की शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन थेट प्रयोगशाळेतून शेतकऱ्यांना हस्तांतरित केले जावे. ते म्हणाले कि, आम्ही ‘आधुनिक कृषी चौपाल’ देखील सुरू केले आहे ज्यामध्ये दर महिन्याला केलेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि आयसीएआर त्या दिशेने काम करत आहे.