ऊस ठिबक संदर्भातील समितीचा अहवाल लवकरच सादर होणार : माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड

पुणे: राज्यातील ऊस लागवड क्षेत्र पूर्णतः ठिबक खाली आणण्यासाठी एका विशेष अभ्यास गटाकडून अभ्यास चालू आहे. या गटाचा अहवाल दोन महिन्यांत सादर केला जाईल, अशी माहिती माजी साखर आयुक्त व ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी दिली.

विद्राव्य खत वितरण (फर्टिगेशन) व सिंचन स्वयंचलन (ॲटोमेशन) तंत्रांद्वारे ‘एकात्मिक ऊस व्यवस्थापन’ या विषयावर नेटाफिम ने आयोजिलेल्या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

गायकवाड म्हणाले की, राज्याच्या ऊस शेतीला फर्टिगेशन व ऑटोमेशन या दोन्ही तंत्राची गरज आहे. सध्याची ऊसशेती १०० टक्के ठिबकखाली कशी आणता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने कृतिगट स्थापन केला होता. सूक्ष्म सिंचन तंत्राचा विस्तार, सिंचन प्रकल्पांच्या कालव्यांमधून बंद नलिकांद्वारे पाणी पुरवणे, ताकारी म्हैसाळसांरख्या उपसा जलसिंचन योजना सौरऊर्जेवर चालविणे या मुख्यांवर धोरणात्मक निर्णय होतील, शेतकऱ्यांना ठिबक संच बसविल्यानंतर अनुदान मिळायला हवे.

परिषदेचे उद्‌घाटन करताना ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले की, ठिबकमुळे केवळ पाणी बचत नव्हे तर पाणी बचत, अन्नद्रव्य व्यवस्थापन, मृदा आरोग्य व उत्पादकतावाद साध्य होते. पाच वर्षात राज्यातील ५० टक्के क्षेत्र ठिबकखाली आणण्याची सरकारने यापूर्वी केलेली घोषणा दुर्दैवाने प्रत्यक्षात उतरलेली नाही. साखर कारखान्यांनी आता गाळप क्षमता वाढविण्यापेक्षा कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकता वाढीवर लक्ष द्यायला हवे, त्यासाठी ठिक्क हाथ प्रभावी उपाय आहे.

फलोत्पादन संचालक डॉ. मोते यांनी, हवामान बदलामुळे नव्या समस्यांमुळे पाण्याचे काटकसरीने वापर न केल्यास भविष्यात अडचणी बाडतील, असा इशारा दिला. पाण्याची उपलब्धता विचारात घेता ऊसशेतीत प्राधान्याने सूक्ष्म सिंचन वाढवावे लागेल. शासकीय यंत्रणा, साखर उद्योग व उत्पादकांनी एकत्रित प्रयत्न केल्यास उसाचे किमान सात लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र ठिबक खाली येणे शक्य आहे,असेही ते म्हणाले.

पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे म्हणाले, की उसाच्या केवळ नव्या जाती आणून उपयोग होणार नाही. सिंचन व अन्नद्रव्याच्या आधुनिक पद्धतींचा प्रसार झाल्याशिवाय अपेक्षित ऊस उत्पादकता वाढणार नाही. ‘व्हीएसआय’चे शास्त्रज्ञ पी. पी. शिंद म्हणाले, की उसाचे येणे बदल प्रमाण ६-७ टक्के असून तो २० टक्क्यांच्या वर नेला पाहिजे. तसेच, डॉ. महानंद माने यांनी सूक्ष्म सिंचन तंत्रामुळे ४० टक्क्यांपर्यंत ऊस उत्पादन वाढते, असे सांगितले. श्री. कृष्णा पाटील डोणगावकर यांनी, राज्यात भूमिगत ठिबकचा प्रसार झालेला नाही. मजुरांवरचे अवलंबन कमी करण्यासाठी ऑटोमेशनचा वापर अपरिहार्य ठरणार आहे, असे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here