४३ कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व मिळवा : डोनाल्ड ट्रम्प यांनी आणली ‘गोल्ड कार्ड’ योजना

वाशिंगटन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता अमेरिकेचे नागरिकत्व विकत घेता येणार असल्याची घोषणा केली आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींना ५ दशलक्ष डॉलर्स (४३ कोटी रुपये) भरून अमेरिकेचे ‘गोल्ड कार्ड्स’ विकत घेता येणार आहे. आधीच्या ग्रीन कार्डची जागा आता गोल्ड कार्ड्स घेणार आहे. मंगळवारी ओव्हल ऑफिसमध्ये बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली.

ट्रम्प म्हणाले की, आधीच्या EB-5 (ग्रीन कार्ड) योजनेची जागा आता गोल्ड कार्ड्स घेणार आहे. गोल्ड कार्ड्स घेणाऱ्यांना अमेरिकेचे कायमस्वरुपी नागरिकत्व दिले जाईल. श्रीमंत लोक अमेरिकेत आल्यास त्यांच्या श्रीमंतीमध्ये आणखी वाढ होईल. ते अधिक यशस्वी होतील. त्यांना इथले कर भरावे लागतील, इथल्या लोकांना रोजगार द्यावा लागेल. ही योजना अभूतपूर्व असे यश मिळवले, यात शंका नाही, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

रशियन नागरिकांनाही गोल्ड कार्ड्स देणार का? असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, हो रशियन अब्जाधीशांनाही याचा लाभ मिळू शकतो. मी काही रशियन अब्जाधीशांना ओळखतो, ते चांगले लोक आहेत. किमान एक दशलक्ष लोकांना गोल्ड कार्ड्स दिले जाऊ शकते, अशी शक्यता यानिमित्ताने वर्तविली जात आहे. आधीच्या ईबी-५ योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना अमेरिकेतील व्यावसायात गुंतवणूक करून नागरिकत्व मिळवता येत होते. १० लोकांना पूर्णवेळ नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन ग्रीन कार्ड योजनेत द्यावे लागत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here