नवी दिल्ली : केंद्रीय अन्न मंत्रालयाने २५ फेब्रुवारी रोजी केलेल्या घोषणेनुसार मार्च २०२५ साठी २३ लाख मेट्रिक टन (एलएमटी) मासिक साखर कोटा मंजूर केला आहे. गेल्या वर्षी, मार्च २०२४ साठी दिलेल्या कोट्यापेक्षा हा कोटा कमी आहे. सरकारने मार्च २०२४ मध्ये, देशांतर्गत विक्रीसाठी २३.५ लाख मेट्रिक टन मासिक साखर कोटा जारी केला होता.
यापूर्वी सरकारने फेब्रुवारी २०२५ साठी २२.५ लाख मेट्रिक टन साखरेचा कोटा मंजूर केला होता. साखर उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, उन्हाळा आणि सणासुदीच्या हंगामाच्या सुरुवातीमुळे देशांतर्गत बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपल्याने बाजारालाही आधार मिळेल.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.