कोल्हापूर : ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी ‘खोपीवरची शाळा’, कर्मवीर हिरे महाविद्यालयाचा उपक्रम

कोल्हापूर : बिद्री सहकारी कारखान्याचे ऊसतोड मजूर कामगार हे ऊस तोडणीसाठी गारगोटी व परिसरात गेल्या तीन महिन्यापासून आहेत. त्यांचे मूळ गाव माजलगाव (जि. बीड) आहे. मूळ गावापासून बाजूला झाल्यामुळे ऊसतोड मजूर कामगारांची मुले गेले कित्येक दिवस शाळेपासून दूर आहेत, म्हणूनच मौनी विद्यापीठ संचलित, कर्मवीर हिरे महाविद्यालया (गारगोटी, ता. भुदरगड) मार्फत शिक्षणाबद्दलची गोडी वाटावी यासाठी ‘खोपीवरची शाळा’ हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो.

या उपक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. उदयकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय देसाई, डॉ. शशिकांत चव्हाण, विभागप्रमुख श्रीमती शारदा पाटील, खोपीवरची शाळा या उपक्रमाचे समन्वयक प्रा. रामचंद्र मेढेकर, सहसमन्वयक डॉ. जयसिंग कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here