पुणे : सोमेश्वर साखर कारखान्यात घोटाळा, अधिकारी कामगारांचे निलंबन, ठेकेदारावर गुन्हा

पुणे : सोमेश्वर कारखान्याच्या ‘टाइम ऑफीस’ने कामावर हजर नसलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नावापुढे हजेरी दाखवून पैसे लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संचालक मंडळाने गुरुवारी कामगार अधिकारी दीपक निंबाळकर याच्यासह टाइम ऑफिसच्या सर्व कामगारांना निलंबित केले आहे. त्यांच्यासह ठेकेदार शशिकांत जगताप याच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी ही माहिती दिली.

अध्यक्ष जगताप यांनी सांगितले की, कामगार अधिकारी दीपक निंबाळकर, धनंजय निकम, दीपक भोसले, रूपचंद साळुंखे, सुरेश होळकर, शिपाई बनकर यांना निलंबित केले आहे. रोजंदारी कामगार नोंदीत फेरफार करून संगनमताने आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी कामगार अधिकारी, हेड टाइम किपर, टाइम किपर, सर्व क्लार्क व अन्य कर्मचारी यांचे निलंबन करत आहोत. ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार आहोत. चुकीचे काम करणाऱ्यास पाठीशी न घालण्याच्या अजितदादांच्या सूचना आहेत. दरम्यान, कारखान्याकडे जवळपास ३०० कंत्राटी कामगार ठेकेदारामार्फत काम करतात. खातेप्रमुख कामगारांच्या हजेरीचे पत्रक टाईम ऑफिसला सादर करतो. टाइम ऑफीसमधील टोळी जे गैरहजर असत. त्यांच्यापैकी काहीची हजेरी दाखवत आणि संबंधित ठेकेदाराशी संगनमत करून पगार लाटत होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here