अहिल्यानगर : चालू गळीत हंगामात मुळा साखर कारखान्यात ६ लाख ३१ हजार मे.टन उसाचे गाळप झाले असून, ५ लाख ४८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले. तसेच ४ कोटी ५५ लाख युनिटच्या वीज निर्मितीबरोबरच ६१ लाख ९० हजार लिटर इथेनॉल व ८२ लाख लिटर आर.एस. तयार केले, अशी माहिती कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांनी दिली.माजी मंत्री शंकरराव गडाख-पाटील यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची शेवटची मोळी टाकून गाळपाची सांगता करण्यात आली.
यावेळी कारखान्याचे संचालक बाळासाहेब गोरे, विश्वास डेरे व ऊस तोडणी मुकादम रतन मानसिंग चव्हाण यांनी सपत्निक गव्हाण व उसाच्या मोळीची विधिवत पूजा केली. याप्रसंगी संचालक बाबूराव चौधरी, लक्ष्मण पांढरे, बापूसाहेब शेटे, बाबासाहेब भणगे, बबनराव दरंदले, सोपानराव पंडित, माजी सभापती रावसाहेब कांगुणे, सुडके महाराज, बाळासाहेब सोनवणे, तुकाराम भणगे, तुकाराम बानकर, दत्तात्रय बेल्हेकर, अॅड. गोकुळ भताने, परमानंद जाधव, आदिनाथ रौंदळ, तुकाराम गुंजाळ, दिलीप पोटे, सरव्यवस्थापक शंकरराव दरंदले, कर्मचारी व ऊस तोडणी यंत्र मालक, ऊसतोडणी व वाहतूक मुकादम व मजूर, ट्रक, ट्रॅक्टर मालक उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्षेत्रातील सर्व उपलब्ध ऊसाचे गाळप पुर्ण करून हंगाम यशस्वीपणे चालवल्याबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर, वर्क्स मॅनेजर एस.डी. पवार, शेतकी अधिकारी विजय फाटके, चिफ इंजिनिअर डी. बी. नवले, चीफ केमिस्ट एस.डी. देशमुख, डिस्टीलरी मॅनेजर बाळासाहेब दरंदले, को. जन इनचार्ज ए.डी. वाबळे, प्रोडक्शन मॅनेजर एस.डी. गाडे यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन सचिव रितेश टेमक यांनी केले. व्यवस्थापक व्ही. के. भोर यांनी समारोप केला.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.