पुणे : रावडेवाडी (ता. शिरूर) येथील पराग ॲग्रो फूड्स अँड अलाईड प्रॉडक्ट्स प्रा. लि या साखर कारखान्याने २०२४-२५ च्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसाला कमीत कमी ३००० रुपये प्रती टन याप्रमाणे बाजारभाव देणार असल्याची माहिती पराग साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत दळवी यांनी दिली आहे. पराग कारखान्याचे २०२४-२५ चे चालू गळीत हंगामात दि. २ मार्चअखेर ५,८०,०२९ मे. टन गाळप झालेले असून ६,०१,३७१ किंटल साखर उत्पादन झाले आहे.
दळवी म्हणाले, कारखाना को- जन व डिस्टिलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू आहे. कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्राबाहेरील बाहेरील उस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षाच्या गळीत हंगामातील गाळपासाठी येणाऱ्या उसाला प्रथम हप्ता प्रती टन २८०० रुपये भाव देण्यात आला आहे. तसेच २०२४-२५ मध्ये गाळपास आलेल्या उसाला कमीत कमी ३००० प्रती टनाप्रमाणे भाव देणार आहे. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस पराग साखर कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत दळवी यांनी केले आहे.