अहिल्यानगर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्यातर्फे सभासदांच्या वारसांना मदतीचा धनादेश

अहिल्यानगर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने सर्व सभासदांचा दोन लाख रुपयांचा विमा उतरवला आहे. त्याअंतर्गत अपघातग्रस्त झालेल्या दोन सभासदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांच्या धनादेशाचे वितरण माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना अतिथीगृह येथे हे धनादेश वितरण करण्यात आले.

माजी आमदार थोरात यांच्या हस्ते कोल्हेवाडी येथील स्व. साहेबराव वामन व आश्वी बुद्रुक स्व. जाखोजी पिलगर यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, गीताराम साबळे उपस्थित होते. वामन व पिलघर कुटुंबीयांचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी सांत्वन केले. साखर कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांचे हित जोपासले आहे. कारखान्याने सभासदांच्या कुटूंबाना वाऱ्यावर सोडलेले नाही असे थोरात यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here