सातारा : दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडियाने धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सने दिलेल्या योगदानाची दखल घेत ‘जयवंत शुगर्स’ला उच्च दर्जाची साखर निर्मिती करण्यात राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानीत केले. नवी दिल्ली येथे हा कार्यक्रम झाला. ‘इंटरनॅशनल कमिशन फॉर युनिफॉर्म मेथडस् ऑफ शुगर ॲनालिसिस’च्यावतीने अध्यक्ष डॉ. मार्टिजन लीजडेकर्स, जनरल सेक्रेटरी डॉ. डायर्क मार्टिन यांच्या उपस्थितीत आणि असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय अवस्थी यांच्या हस्ते जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कारखान्याचे चीफ केमिस्ट बी. जी. चव्हाणके उपस्थित होते.
जयवंत शुगर्सने डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली साखर उद्योगात मोलाची कामगिरी बजावली आहे. या पुरस्काराबद्दल कारखान्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले, मार्गदर्शक आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, विनायक भोसले यांनी ‘जयवंत शुगर्स’चे ऊस पुरवठादार शेतकरी सभासद, अधिकारी, कर्मचारी, ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार या सर्वांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक संभाजीराव कडू-पाटील, मार्क लॅबच्या डॉ. वसुधा केसकर, डॉ. एस. एस. निंबाळकर आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या:
सातारा : सह्याद्री कारखान्यासाठी आतापर्यंत ९४ अर्ज दाखल, विरोधी गटाकडून जोरदार आरोप
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.