पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक २०२५ – २०३० निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज माघारी नंतर संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांपैकी १७ जागा बिनविरोध होऊन ४ जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली. कारखान्यात विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचीच निर्विवाद सत्ता राहणार असल्याचे दिसून आले आहे. आता शिरोली बुद्रुक गट व इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातील निवडणुकीची औपचारिकता बाकी आहे. यावेळी शेतकरी संघटनेने उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र साखर कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने शेतकरी संघटनेने माघार घेतली असे प्रमोद खांडगे यांनी सांगितले.
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या बिनविरोध निवडलेल्या १७ जागांमध्ये अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप यांच्यासह संतोष खैरे, धनंजय डुंबरे, विवेक काकडे, देवेंद्र खिलारी, यशराज काळे, नामदेव थोरात, दत्तात्रेय थोरात, प्रकाश सरोदे, नीलम तांबे, पल्लवी डोके या विद्यमान संचालकांना पुन्हा संधी मिळाली आहे. तर माजी संचालक प्रकाश जाधव, विलास दांगट, सुरेश गडगे यांना नव्याने संधी मिळाली आहे. तर अविनाश पुंडे, बाळासाहेब घुले, पंकज वामन, रामदास वेठेकर, संजय खेडकर, सुधीर खोकराळे हे नवीन चेहरे आहेत. आता शिरोली बुद्रुक गटातील ऊस उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदार संघातील ३ जागांसाठी ४ उमेदवार व इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघाच्या १ जागेसाठी ३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.