उत्तर प्रदेश : स्मार्ट ऊस अ‍ॅप शेतकऱ्यांना देणार बियाण्यांबद्दल माहिती

मुरादाबाद : ऊस उत्पादक शेतकरी आता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करू शकणार आहेत. त्यासाठी ऊस विकास विभागाने नवनवे उपक्रम सुरू केले आहेत. आता कोणताही शेतकरी स्मार्ट ऊस ॲपद्वारे ऊस बियाण्याच्या उपलब्धतेची माहिती मिळवू शकतो. ऊस बियाण्याच्या उपलब्धतेबाबतची सर्व माहिती ऊस विकास विभागाच्या स्मार्ट ऊस शेतकरी (SGK) पोर्टलवर enquiry.caneup.in वर उपलब्ध असेल.

स्मार्ट गन्ना ॲपद्वारे शेतकऱ्यांना ऊस बियाण्यांची माहिती मिळणार आहे. त्याबाबतची माहिती ऊस विकास विभागाच्या वेबसाइटवरदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात सरकारने ऊस उत्पादनाला गती देण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना अधिकाधिक माहिती मिळण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर माहिती देण्यास सुरुवात केली आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन ऊस विकास विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here