अहिल्यानगर : साखर कामगारांच्या वेतनवाढीचा प्रश्न महत्त्वाचा आहे मात्र त्यासाठी सर्व साखर कामगार संघटनांनी एकत्र येण्याची गरज आहे. नाहीतर साखर कामगारांचे फार मोठे नुकसान होऊ शकते. या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा लागेल, असे मत महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी व्यक्त केले. अहिल्यानगर जिल्हा साखर कामगार समन्वय समितीच्या कार्यकत्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन मुळा कारखाना राष्ट्रीय साखर कामगार युनियन सोनई यांनी केले होते. यावेळी काळे बोलत होते. संघटनेचे सरचिटणीस शंकरराव भोसले यांनी साखर उद्योग अडचणीत असल्याचे कारण दाखवून कामगारांची दिशाभूल केली जाते परंतु साखर धंद्यात कामगारांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यासाठी साखर कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, असे सांगितले
यावेळी प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव भोसले, कार्याध्यक्ष रावसाहेब पाटील, महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे सरचिटणीस आनंदराव वायकर, कार्याध्यक्ष शिवाजी औटी, जिल्हा समन्वय समितीचे सरचिटणीस डी.एम. निमसे, कोषाध्यक्ष अशोकराव पवार, अविनाश आपटे, सल्लागार उपाध्यक्ष ज्ञानदेव पाटील आहेर, सेक्रेटरी रवी तांबे, अगस्तीचे कैलास जाधव, राहुरीचे अर्जुन दुशिंग, पूर्णा कारखान्याचे यु.एन. लोखंडे, वसंत पुसदचे विनोद शिंदे, पारनेर कारखान्याचे शिवाजी औटी, श्रीगोंदा कारखान्याचे रामभाऊ लबडे, संगमनेरचे रामभाऊ राहणे, अगस्तीचे शिवाजी कोठवळ, कैलास जाधव, प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष युवराज रणवरे, संजय मोरबाळे, कोषाध्यक्ष प्रदिप बणगे, वसंत शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीसाठी ज्ञानेश्वर कारखान्याचे अशोकराव आरगडे, दत्तात्रेय चोपडे, वृद्धेश्वर कारखान्याचे अंकुश जगताप, एकनाथ जगताप, शेषनारायण मस्के, मुळा कारखान्याचे कारभारी लोडे, सुभाष सोनवणे, आदिनाथ शेटे, गोविंद कोंगे उपस्थित होते. सूत्रसंचालन युनियनचे सरचिटणीस डी.एम. निमसे यांनी केले.