पुणे : जिल्ह्यातील १४ कारखान्यांकडून एक कोटी टनांहून अधिक ऊस गाळप

पुणे : जिल्ह्यात गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये आतापर्यंत १४ साखर कारखान्यांनी सुमारे एक कोटी तीन लाख २५ हजार ४९३ मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. सरासरी ९.३५ टक्के उतार्‍यानुसार ९६,५२,६४४ क्विंटल साखर उत्पादन तयार केले आहे. जिल्ह्यात एकूण एक कोटी ४९ लाख मेट्रिक टन उसाच्या गाळपाचा अंदाज आहे. याचा विचार करता अद्याप सुमारे ४६ लाख टन उसाचे गाळप होणे बाकी आहे. आतापर्यंत इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी व निरा- भीमा सहकारी साखर कारखाने बंद झाले आहेत, अशी माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात सर्वाधिक ऊसगाळप आणि साखर उत्पादनात बारामती अ‍ॅग्रोने आघाडी घेतली आहे. कारखान्याने सर्वाधिक १६,९०,०८६ मे. टन ऊस गाळप केले आहे. सरासरी ८.२५ टक्के उतार्‍यानुसार १३,६१,५८९ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. ऊस गाळपात त्या खालोखाल दौंड शुगरने चांगली कामगिरी केली आहे. कारखान्याने १४,९१,६४२ मे. टन उसाचे गाळप करून ८.२२ टक्के उतार्‍यानुसार ११,७९,७०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. श्रीसोमेश्वर सहकारी कारखान्याने १०,३४,३७० मे. टन उसाचे गाळप करून ११.६ टक्के उतार्‍यानुसार १२,०६,९०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. श्रीसंत तुकाराम सहकारी कारखान्याचा उतारा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ११.४७ टक्के आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महाराष्ट्र : राज्यातील आणखी नऊ साखर कारखान्यांना सरकारकडून 1100 कोटींची थकहमी

 

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here