सोलापूर : आमदार अभिजित पाटील हे दिलेला शब्द पाळतात. विठ्ठल साखर कारखाना अडचणीत असतानाही ताब्यात आल्यावर जुनी देणी दिली. तशाच पद्धतीने साडेतीन हजार रुपयांचा उसाला दरही निश्चित मिळेल. आ. पाटील यांच्यावर केलेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे प्रत्युत्तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रा. तुकाराम मस्के यांनी दिले.
शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख मुन्ना साठे यांनी साडेतीन हजारांचा ऊसदर न देऊन अभिजित पाटील यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची टीका केली होती. त्या आरोपास मस्के प्रत्युत्तर देताना म्हणाले की, पंढरपूरचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद पडला होता, तो दिवाळखोरीच्या मार्गावर होता. तो ताब्यात घेऊन शेतकऱ्यांसहीत, तोडणी वाहतूक आणि कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमा प्रथम दा करून या कारखान्याचा गळीत हंगाम सुरू केला. पहिल्या व दुसऱ्या गळीत हंगामात जाहीर केल्याप्रमाणे अनुक्रमे अडीच हजार आणि तीन हजार रुपये दर दिला आहे. हे लक्षात घेतल्यास यंदाच्या गळीत हंगामातही जाहीर केलेल्या दराचा शब्द पाळला जाईल. जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या पेक्षा हा दर जास्त असल्याने ऊसाचे पेमेंटचे बाबतीत विठ्ठल सहकारी साखर कारखाना जिल्ह्यात अग्रेसर राहिला असल्याचे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या:
महाराष्ट्र : राज्यातील आणखी ५० हजार शेतकऱ्यांना ‘एआय’ प्रकल्पात सहभागी होण्याची संधी
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.