सोलापूर : गेल्यावर्षीच्या दुष्काळाचा सोलापूर जिल्ह्यातील यावर्षीच्या ऊस गाळप हंगामाला मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकत्याच संपलेल्या हंगामात गतवर्षीच्या तुलनेत ऊस गाळपात ४० टक्के तर साखर उत्पादनात ४६ टक्के घट झाली आहे. सरासरी साखर उताऱ्यातही एक टक्का घट झाली आहे. यंदा हंगाम २०२४-२५ मध्ये जिल्ह्यात १,५०,५८६ हेक्टर क्षेत्रातील ऊस गाळपास उपलब्ध होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ६० हजार हेक्टरने उसाच्या क्षेत्रात घट झाली. यंदा १२ सहकारी व २१ खासगी अशा एकूण ३३ कारखान्यांनी ऊस गाळप केले. या कारखान्यांनी १,०१,७४,४०३ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. ८.४१ टक्के सरासरी साखर उताऱ्याने ८६,१०,८१३ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.
गेल्यावर्षी, हंगाम २०२३-२४ मध्ये जिल्ह्यात २,१०,९५७ हेक्टर क्षेत्रातील ऊस गाळपास उपलब्ध होता. मागीलवर्षी ३६ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. या कारखान्यांनी १,६८,४६,७५१ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १,५९,३२,९०० क्विंटल साखर उत्पादन घेतले होते. मागील वर्षीच्या तुलनेत गाळपात ६६,७२,३४८ मेट्रिक टन तर साखर उत्पादनात ७३,२२,०८७ क्विंटल घट झाली आहे
महत्त्वाच्या बातम्या:
सांगली : जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांकडे जिल्हा बँकेचे ५५० कोटी थकले
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.