२०३२ पर्यंत ब्राझीलमधील मक्यापासून इथेनॉल उत्पादन जवळजवळ दुप्पट होणार : रिपोर्ट

साओ पाउलो : २०३२ पर्यंत ब्राझीलचे वार्षिक कॉर्न (मका) इथेनॉल उत्पादन जवळजवळ दुप्पट होऊन सुमारे १६ अब्ज लिटर होईल, असा अंदाज गुंतवणूक बँक सिटीने मंगळवारी प्रकाशित केलेल्या एका संशोधन रिपोर्टमध्ये म्हटले आहे, रिपोर्टमध्ये उद्योगाच्या जलद विस्ताराचा उल्लेख आहे. सिटीच्या मते, २०२३ ते २०२४ या कालावधीत ब्राझीलने सुमारे ६.३ अब्ज लिटर कॉर्न इथेनॉलचे उत्पादन केले होते, जे चालू हंगामात ९.५ अब्ज लिटरपर्यंत वाढण्याचा अंदाज बँकेने वर्तवला आहे.

 

गेल्या वर्षीपर्यंत ब्राझीलमध्ये २२ कार्यरत कॉर्न इथेनॉल प्लांट होते, तर १२ अतिरिक्त प्लांट उभारले जात आहेत आणि आणखी नऊ प्लांटना बांधकामासाठी हिरवा कंदील मिळाला आहे, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. मका  ब्राझीलच्या इथेनॉल बाजारपेठेत सातत्यपूर्ण पुरवठा सुनिश्चित करून संतुलन साधू शकते, असेही अहवालात म्हटले आहे. जानेवारीमध्ये, ब्राझीलच्या नॅशनल कॉर्न इथेनॉल युनियन (UNEM) ने देशाच्या दक्षिण मध्य प्रदेशात कॉर्न इथेनॉल उत्पादन मागील कालावधीच्या तुलनेत चालू हंगामात 30% वाढेल, असा अंदाज वर्तवला होता. या हंगामात उत्पादन अंदाजापेक्षा सुमारे 200 दशलक्ष लिटरने जास्त होईल, ज्यामुळे एकूण उत्पादन सुमारे 8.2 अब्ज लिटर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here