सोमवार, १ जुलै २०१९
डोमेस्टिक मार्केट: आठवड्याच्या सुरवातीला देश भरातील साखर बाजारात शांतता दिसली. महाराष्टातील कारखान्यांचे भाव ३१०० ते ३१४० रुपये ओपन राहीले. तर दुसरीकडे रिसेल चा व्यापार ३०२० ते ३०५० रुपये राहिला. उत्तर प्रदेश मध्ये भाव ३२२० ते ३३५० रुपये तर रिसेल चा व्यापार ३१३० ते ३२२० रुपयात झाला. गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार ३१०० ते ३१५० रुपये राहिला. तामिळनाडू मध्ये GST सोडून साखरेचे भाव ३२४० ते ३३२० रुपये होते.
इंटरनॅशनल मार्केट: बाजारात काही मोठी हालचाल दिसून नाही आली. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव ३२९.६० डॉलर तर यु.एस साखरेचा व्यापार १२.७५ सेंट्स होता.
कच्या साखरेचे FOB इंडिकेशन ३३६ ते ३३८ डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव ३५२ ते ३५५ डॉलर राहिले.
एक्स फॅक्टरी अनुसार कच्या साखरेची मागणी २१००० ते २१३०० रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर २२००० ते २२२०० रुपये प्रति मेट्रिक टन होती.
करन्सी आणि कमोडिटी: रुपया अमेरिकी डॉलर च्या तुलनेत ६८.९४ वर होता तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ३.५ राहिला, क्रूड फ्युचर्स ४१४१ रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI ५९.९४ डॉलर होते
इक्विटी : बीएसई ३० सेंसेक्स २९१ आक्कांनी वाढून ३९६८६ अंकांवर तर एनएसई निफ्टी ७६ अंकांनी वाढून ११८६५ अंकांवर राहिला.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.