अहिल्यानगर : येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखाना प्रतिकूल परस्थितीत प्रत्येक हंगाम करीत आहे. कारखाना परिसरातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरला आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष अड. प्रतापराव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या सर्व संचालक मंडळाने कारखान्याचे व सर्व सभासदांचे हीत लक्षात घेऊन योग्य दिशेने वाटचाल सुरू ठेवली आहे. चालू हंगामात कारखान्याने अत्यंत कमी कालावधीत १ लाख ३३ हजार मेट्रिक टन उसाचे गळीत यशस्वीपणे पूर्ण केले, असे प्रतिपादन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे यांनी केले. कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता बुधवारी झाली. यावेळी ते बोलत होते.
हंगाम सांगताप्रसंगी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुरेश होळकर, त्रिंबकराव चेमटे, मोहनराव दहिफळे, सदाशिव दराडे व मुख्य शेती अधिकारी विराज गर्जे यांचे हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, मुख्य अभियंता प्रवीण काळुसे, चीफ केमिस्ट रामनाथ पालवे, चीफ अकाउंटट तीर्थराज घुंगरट, प्रशासकीय अधिकारी पोपट केदार, उपशेतकी अधिकारी अभिमन्यू विखे, गोडवून किपर अधिकारी तुकाराम वारे, केनयार्ड विभागाचे किसन पोपळे, शरद सोनवणे, संजय चेमटे, सचिन राऊत उपस्थित होते.