अहिल्यानगर : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे होते. यावेळी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुरक्षा साधने प्रदर्शनाचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर कामगारांना सुरक्षा शपथ देण्यात आली. गेल्या वर्षभरात कारखान्यात अपघात टाळण्यासाठी ज्या कामगारांनी मदत केली, त्यांचा उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, संचालक बाळासाहेब वक्ते, बापूसाहेब बाराहाते, मनेष गाडे, ज्ञानेश्वर होन, रमेश घोडेराव, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, कामगार नेते मनोहर शिंदे, वेणुनाथ बोळीज, आदींच्या हस्ते सत्कार आला.
यावेळी कार्यकारी संचालक बाजीराव सुतार म्हणाले की, कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या व्यक्तीगत सुरक्षेला संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी प्राधान्य दिले आहे. कामगारांना सर्व आधुनिक सुरक्षा साधने उपलब्ध करून दिलेली आहेत. कामगारांनी अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करून काम करावे. व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनीही मार्गदर्शन केले. साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे व सुरक्षा अधिकारी सलमान शेख यांनी स्वागत केले. यावेळी एच. आर. मॅनेजर विशाल वाजपेयी, वर्क्स मॅनेजर व्ही. एम. भिसे, सुरक्षा अधिकारी रमेश डांगे, भास्करराव बेलोटे आदी उपस्थित होते.