‘या’ देशात ऊस चोरीमुळे उडाली शेतकऱ्यांची झोप, शेतांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमले सुरक्षा रक्षक

मसिंदी (युगांडा) : जिल्ह्यातील पोलिस शेतकऱ्यांच्या विविध शेतांमधून ऊस चोरीच्या वाढत्या घटनांचा तपास करत आहेत. शेतकऱ्यांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या उसाची रात्री राखण करावी लागत असल्याने त्यांची रात्रीची झोप उडाली आहे. चोरटे ऊस ट्रकमध्ये भरून घेऊन जातात. याबाबत, ऊस चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी उसाच्या शेतांवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे असे पाकानी उप-काउंटीमधील व्यावसायिक ऊस उत्पादक रॉजर्स मुगिसा यांनी सांगितले.

मुगिसा म्हणाले की, जर तुम्ही रात्रीच्या वेळी तुमच्या शेताची राखण केली नाही तर तुमचे ऊस पीक चोरीला जाऊ शकते. शेतकरी रिचर्ड असीमवे यांनी सरकारला देशातील ऊस चोरी थांबवण्यासाठी ठोस रणनीती आखण्याचे आवाहन केले. ऊस पिक तोडणीच्या टप्प्यावर असताना, तो गाळपास जाईपर्यंत आपण झोपू शकत नाही, असे असीमवे म्हणाले. गेल्या आठवड्यात सुरक्षा रक्षकांनी एका शेतकऱ्याच्या शेतातून होणारी ऊस चोरी रोखली आणि एक ट्रकही जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किन्यारा शुगर लिमिटेडला ऊस पुरवण्यासाठी करार केलेला एका शेतकऱ्याच्या मळ्यातील ऊस चोरून नेला जात असताना रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षकांनी ट्रक थांबवला. स्थानिक पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली.

ट्रक मालक अँड्र्यू काहवा यांनी सांगितले की, त्यांच्या कामगारांना एका शेतातून ऊस लोड करण्यासाठी आणि मासिंदी नगरपालिकेतील किहांडे सेल येथील वजनकाट्यावर ऊस नेण्यासाठी बोलावण्यात आले होते. जेव्हा ट्रकमध्ये ऊस भरला गेला, तेव्हा किन्यारा शुगर लिमिटेडशी संलग्न सुरक्षा रक्षकांनी तो थांबवला. किन्यारा शुगर लिमिटेडचे जनसंपर्क अधिकारी फ्रान्सिस मुगेरवा म्हणाले की, ही घटना ऊस चोरीच्या अनेक घटनांपैकी एक आहे. अनेक शेतकऱ्यांनी आमच्याकडे आणि अनेक सरकारी संस्थांकडे तक्रार केली आहे की, लोक त्यांचा ऊस चोरून लाखो शिलिंगचे नुकसान करत आहेत. किन्यारा शुगर लिमिटेडकडे ऊस चोरीच्या ४५० हून अधिक प्रकरणांची यादी असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रमुख बातमी : कर्नाटकमध्ये साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ३,३६५ कोटी रुपये थकीत

साखर उद्योग आणि संबंधित क्षेत्रांवरील बातम्यांसाठी, चीनीमंडी वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here