केंद्र सरकारने साखर विक्री दर, इथेनॉल दरवाढ करून दिलासा द्यावा : बिपीन कोल्हे

कोपरगाव : साखर उद्योगात अलिकडच्या काळात जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. त्यावर शासनाने वेळीच उपाययोजना केली पाहिजे. केंद्राने एफआरपीत जशी वाढ केली. त्याच धर्तीवर साखर विक्री दरात व ज्यूसपासून तयार होणाऱ्या इथेनॉल दरात तात्काळ वाढ करून दिलासा द्यावा, अशी मागणी संजीवनी उद्योगाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिली. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगामाची सांगता संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे मार्गदर्शन करत होते. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात एआय तंत्रज्ञान, उपग्रहाच्या सहायाने उस उत्पादन वाढ, तोडणी ते गाळप आदीची अंमलबजावणी होत आहे असे ते म्हणाले.
यावेळी बिपीन कोल्हे म्हणाले की, वाहनांसाठी लागणाऱ्या सहकारी तत्वावरील देशातील पहिला बायो- सीएनजी प्रकल्पाचे काम अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी पूर्ण केले आहे. पहिल्या टप्प्यात ५ टन उत्पादन घेण्याबाबतच्या सर्व चाचण्या माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या जयंतीनिमीत्त २४ मार्च रोजी पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. दरम्यान, यावेळी युवा अध्यक्ष विवेक कोल्हे, उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, दत्तात्रय कोल्हे, रमेश व छायाताई घोडेराव या उभयतांच्या हस्ते गळीत हंगामाची सांगता झाली. मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार यांनी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सेक्रेटरी टी. आर. कानवडे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here