करमाळा : आदिनाथ कारखान्यासाठी आजी-माजी आमदारांसह २७२ जणांचे अर्ज

करमाळा : गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी, सोमवारी आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजय शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह २७२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आत्तापर्यंतच्या आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीतील उच्चांकी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची छाननी, आज, मंगळवारी होणार आहे. त्यानंतर २ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमोलसिंह भोसले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिल्पा ठोकडे हे काम पाहत आहेत.

निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये प्रा. रामदास झोळ, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, शंभूराजे जगताप, अमोल गाडगे, सुजित बागल, माजी संचालक दशरथ कांबळे, रमेश कांबळे, हरिदास केवारे, धुळाभाऊ कोकरे, प्रशांत पाटील, नवनाथ झोळ आदींचा समावेश आहे. अर्ज दाखल करण्याच्या वेळी पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पोपट टिळेकर यांनी बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, गेली अनेक वर्ष आदिनाथ कारखाना ताब्यात असूनदेखील बागल कुटुंबातील एकही व्यक्तीने पहिल्यांदाच उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. दरम्यान, निवडणुकीसाटी असलल्या ऊस पुरवठ्याच्या अटीबाबत वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागवले आहे असे निवडणूक अधिकारी अमोलसिंह भोसले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here