रुडकी : जिल्ह्यात ऊस हे मुख्य पीक आहे. सद्यस्थितीत ऊस लागवडीचे काम जवळजवळ ७० टक्क्यापर्यंत पूर्ण झाले आहे. मात्र, जिल्ग्यातील ऊस तोडणीदरम्यान, पिकावर टॉप बोरर किडीटा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. उसावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
ऊस तोडणीचे कामही अंतिम टप्प्यात आहे. सकाळी आणि संध्याकाळी, शेतकऱ्यांनी आधीच ऊस तोडलेल्या शेतातील उभ्या पिकावर पांढऱ्या फुलपाखरासारख्या किडीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. शेतकरी सौरभ कुमार, मनोज कुमार अजित सिंग इत्यादींनी सांगितले की, हे पांढऱ्या रंगाचे फुलपाखरू पानांवर बसून अंडी घालते. त्यामुळे उसात टॉप बोअरर नावाचा रोग होतो आणि तो वेगाने पसरतो. अनेक ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आल्याने शेतकरी धास्तावले आहेत.