उत्तराखंड : ऊस आयुक्तांना हटविण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

रुडकी : ऊस आयुक्तांना हटवण्याची मागणी करत ऊस विभागातील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना निवेदन सादर केले. कर्मचाऱ्यांनी माजी कॅबिनेट मंत्री स्वामी यतिश्वरानंद यांचीही भेट घेतली. गेल्या तीन दिवसांपासून ऊस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी ऊस आयुक्तांना हटवण्याची मागणी करत आहेत, आयुक्तांकडून विभागीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन, शोषण केले जात असल्याचा आरोप आहे. गुरुवारी, विभागीय कर्मचाऱ्यांनी उत्तराखंड ऊस निरीक्षक संघटनेचे राज्य संयोजक दिग्विजय सिंह आणि उत्तराखंड ऊस पर्यवेक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष सुरेश चंद्र डबराल यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची भेट घेतली.

‘अमर उजाला’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कर्मचाऱ्यांनी ऊस आयुक्तांच्या कार्यशैली आणि वर्तनाबद्दल तक्रार केली आहे. कर्मचाऱ्यांनी माजी कॅबिनेट मंत्री स्वामी यतिश्वरानंद यांची भेट घेऊन सांगितले की, ऊस आयुक्तांच्या वर्तनाबद्दल राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे. या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याची गरज आहे. यावेळी दिग्विजय सिंह, सूरज भान, वीरेंद्र कुमार चौधरी, रमन सैनी, आनंद तिवारी, अरविंद शर्मा, सतीश सैनी, सुरेश सेमवाल, दिनेश कुमार, अमित कुमार, प्रीतम सिंह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here