लातूर : विलास कारखान्याच्या चेअरमनपदी वैशाली देशमुख यांची निवड

लातूर : मांजरा परिवारातील विलास सहकारी साखर कारखान्याची २१ जागेसाठी नुकतीच पंचवार्षिक निवडणूक झाली. लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विलासराव देशमुख सहकार पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली. यात सर्व सभासदांनी ही निवडणूक बिनविरोध निवडून दिली. आता कारखान्याच्या चेअरमनपदी वैशाली विलासराव देशमुख यांची तर व्हाइस चेअरमनपदी माजी आमदार वैजनाथ शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.

चेअरमन, व्हाइस चेअरमन निवडीसाठी आयोजित बैठकीपूर्वी कारखाना परिसरातील माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर चेअरमन आणि व्हाइस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया उपविभागीय अधिकारी, निवडणूक अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे यांच्या उपस्थितीत आणि नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत झाली.

बैठकीस अमित देशमुख, रवींद्र काळे, रणजित पाटील, अनंत बारबोले, रसूल पटेल, तात्यासाहेब पालकर, गोवर्धन मोरे, हणमंत पवार, नरसिंग बुलबुले, नेताजी साळुंके (देशमुख), नितीन पाटील, रामराव साळुंके, अमृत जाधव, सतीश शिंदे पाटील, दीपक बनसोडे, लताबाई रमेश देशमुख, शाम बरुरे, सुभाष माने या संचालकांसह सहायक निबंधक आर. एल. गडेकर, नायब तहसीलदार अर्चना मैंदर्गी, नायब तहसीलदार सुधीर देशमुख, महसूल सहायक ओमप्रकाश मेहकर उपस्थित होते. मांजरा परिवारातील सर्व साखर कारखान्यांच्या निवडणुका सभासदांनी बिनविरोध पार पाडल्या आहेत. या संस्थेच्या जडणघडणीत प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे, असे अमित देशमुख यांनी यावेळी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here