सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्यावर आमदार नारायण पाटील यांच्या पॅनलचे निर्विवाद वर्चस्व

सोलापूर : करमाळा विधानसभा निवडणुकीनंतर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील आमदार नारायण पाटील यांनी माजी आमदार संजय शिंदे यांना पराभवाचा धक्का दिला. साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांच्या आदिनाथ संजीवनी पॅनेलने माजी आमदार संजय शिंदे यांच्या महायुती आदिनाथ बचाव पॅनेलचा पराभव केला आहे. सर्व २१ संचालकांच्या जागांवर आदिनाथ संजीवनी पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. विजयानंतर नूतन संचालक व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. निवडणुकीत आमदार नारायण पाटील हे सर्वाधिक २५८३ मताधिक्याने विजयी झाले आहेत. विमुक्त मतदारसंघात आमदार नारायण पाटील यांनी ९४६२ मते घेत विरोधी उमेदवार अनिल केकान यांचा २५८३ मतांनी पराभव केला.

आमदार नारायण पाटील यांना खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा पाठिंबा होता. बागल गटानेही आमदार पाटील यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला. बागल गटाच्या पाठिंब्याचा पाटील यांना शेवटच्या टप्प्यात खूप मोठा फायदा झाला. तर माजी आमदार संजय शिंदे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार यांच्या बारामती अग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, यांसह महायुतीचा पाठिंबा होता. विजयी उमेदवार असे – दत्तात्रय गव्हाणे, श्रीमान चौधरी, महादेव पोरे, रविकिरण फुके, दशरथ हजारे, आबासाहेब अंबारे, दत्तात्रेय देशमुख, विजय नवले, महेंद्र पाटील, किरण कवडे, नवनाथ झोळ, संतोष पाटील, देवानंद बागल, राहुल सावंत, अमोल घाडगे, दादासाहेब पाटील, नारायण पाटील, राधिका तळेकर, ऊर्मिला सरडे, राजाभाऊ कदम, हरिदास वारे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here