कोल्हापूर : येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याला को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे को-जनरेशन पॉवर प्लांटचा विशेष पुरस्कार पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. को-जन इंडियाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील व संचालक मंडळाने स्वीकारला. यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, हर्षवर्धन पाटील, संयोजक संजय खताळ, जयप्रकाश दांडेगावकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे अधिकारी | रामचंद्र तोरसे यांना बेस्ट डीएम प्लांट मॅनेजर पुरस्कारही मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. याबाबत अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, ‘या यशात सर्व श्रमजीवी घटकांचा समावेश आहे. त्या सर्वांना आजचा पुरस्कार समर्पित.’ यावेळी सुनीलराज सूर्यवंशी, धनाजीराव देसाई, सत्यजित जाधव, राहुल देसाई, के. ना. पाटील, मधुकर देसाई, पंडित केणे, राजेंद्र पाटील, रंगराव पाटील, फत्तेसिंग भोसले, संभाजीराव पाटील, राजेंद्र भाटले, रवींद्र पाटील, दीपक किल्लेदार, फिरोजखान पाटील, रणजीत मुडकशिवाले, ए. वाय. पाटील-म्हाकवेकर, संदीप पाटील, रामचंद्र कांबळे, रावसाहेब खिलारी यांच्यासह युनियन अध्यक्ष संजय मोरबाळे, शिवाजी केसरकर, राजेंद्र पाटील उपस्थित होते.