कोल्हापूर : केनवडे (ता. कागल) येथील श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्सचा सन २०२५-२६ च्या ऊस गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक कराराचा प्रारंभ करण्यात आला. अन्नपूर्णा कारखान्याने यावर्षी शेतकरी व तोडणी वाहतूकदारांच्या सहकार्याने यंदा १ लाख ८३ हजार ८८४ मेट्रिक टन उसाचे गाळप करत चौथा गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण केला. शेतकऱ्यांच्या उसाची बिले कारखान्याने आदा केली आहेत. पुढील वर्षासाठी तोडणी-वाहतूक कंत्राटदार यांचे करार प्रारंभ करण्यात आला.
कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार संजयबाबा घाटगे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अंबरिशसिंह घाटगे, शेती अधिकारी श्रीनिवास कुलकर्णी, चीफ इंजिनिअर राजू मोरे, चीफ केमिस्ट सुनील कोकितकर, चीफ फायनान्स मॅनेजर शामराव चौगले, कृष्णात कदम, शिवराम भरमकर यांच्या हस्ते करार झाले. पुढील वर्षी सुमारे अडीच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा ऊस कारखान्याकडे पाठवण्याचे आवाहन चेअरमन घाटगे यांनी केले. यावेळी ऊस पुरवठा अधिकारी सुनील देसाई, गजानन पाटील, साईराज बेनके, संतोष पाटील, संजीव नाईक, दत्तात्रय पाटील, पिंटू दावणे, बाजीराव पाटील, दत्ता दंडवते, संदीप कोगनोळे आदी उपस्थित होते.