सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर १ पिंपळनेर व युनिट नंबर २ करकंब या कारखान्याच्या माध्यमातून व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसीय कृती आराखड्यानुसार साखर कारखान्यातील कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. माजी आमदार बबनराव शिंदे म्हणाले, कोणत्याही उद्योगाच्या प्रगतीमध्ये कामगार महत्त्वाचा घटक आहे. कारखान्यामार्फत कामगारांसाठी सातत्याने कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे कारखाना व व्यवस्थापन यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित झालेले आहेत.
कार्यस्थळावर सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये डॉ. देवेंद्र बी. इंगळे (मुंबई) व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित राहून कामगारांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये कामगारांची साखर, रक्तदाब, फुफ्फुस व इतर तपासणी करण्यात आली. तसेच कामगारांना आरोग्याचे अनुषंगाने घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये युनिट नंबर १ पिंपळनेर येथील ६०० व युनिट नंबर २ कडील ३०० कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती माजी आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.
यावेळी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एन. डिग्रजे, युनिट २ चे जनरल मॅनेजर एस. आर. यादव, जनरल मॅनेजर प्रोसेस पी. एस. येलपले, फायनान्स मॅनेजर डी. डी. लव्हटे, केन मॅनेजर एस. पी. थिटे, चिफ इंजिनिअर एस. डी. कैचे, डिस्टिलरी मॅनेजर पी. व्ही. बागल, सिव्हिल इंजिनिअर एस. आर. शिंदे, हेड टाईम कीपर आर. एन. आतार, युनिट २ चे चिफ इंजिनिअर एस. एस. महामुनी, चीफ केमिस्ट बी. जे. साळुंखे, मुख्य शेतकी अधिकारी आर. जी. पाटील, शेतकी अधिकारी बी. डी. इंगवले, सिव्हिल इंजिनिअर एन.सी. मोरे आदी उपस्थित होते.