सोलापूर : सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम २०२५-२६ करिता कारखान्याने ९ लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. बैलगाडी, बजाट, ट्रक, ट्रॅक्टर व ऊस तोडणी यंत्राचे मालक व ठेकेदार यांनी जास्तीत जास्त तोडणी वाहतुकीचे करार करून गाळप हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी केले आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये गळीत हंगाम २०२५ २६ करिता बैलगाडी, बजाट, ट्रक, ट्रॅक्टर व ऊस तोडणी यंत्र यांचे तोडणी वाहतूक करारांचा शुभारंभ चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. कारखान्याकडे गत हंगाम २०२४-२०२५ मध्ये ऊस तोडणी वाहतुकीचे काम केलेल्या वाहनमालक यांची ऊस तोडणी वाहतुकीची संपूर्ण बिले अदा करण्यात आली असल्याचे कार्य, संचालक राजेंद्र चौगुले यांनी सांगितले. यावेळी व्हा. चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालक सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, अमरदीप काळकुटे, सुभाष कटके, रणजित रणनवरे, पांडुरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, धनंजय सावंत, केशव ताटे, राजेंद्र शिंदे, रमेश मिसाळ, कल्याणराव दुपडे, रामदास बेलदर, आगतराव शिंदे, वसंत जाधव, विजय माने-देशमुख तसेच बैलगाडी, बजाट, ट्रक, ट्रॅक्टर व ऊस तोडणी यंत्राचे मालक, ठेकेदार आणि खातेप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.