सांगलीत बाजार समितीत गुळाच्या आवकेत वाढ, प्रति क्विंटल ३३३० ते ४३०८ रुपये दर

सांगली : येथील बाजार समितीत गेल्या आठवड्यापेक्षा चालु आठवड्यात गुळाची आवक ७६२९ क्विंटलने वाढली आहे. गुळाला प्रति क्विंटल किमान ३३३० तर कमाल ४३०८ रुपये असा दर मिळाला. गूळ, हळद आणि बेदाण्याचे दर टिकून असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. समितीत मिरचीचीही आवक वाढली आहे. मिरचीची २८९५ क्विंटल आवक झाली होती. गतसप्ताहाच्या तुलनेत चालु सप्ताहात ३७१ क्विंटलने आवक जास्त आहे. मिरचीस प्रति क्विंटल किमान १२६०० तर कमाल १६४०० रुपये असा दर होता. बाजारपेठेत बेदाण्याच्या मागणी किंचित कमी झाली आहे. त्यामुळे आवकही मंदावली आहे. बेदाण्याची ७६५७क्विंटल आवक झाली होती. गतसप्ताहाच्या तुलनेत चालु सप्ताहात १३९०९ क्विंटलने आवक कमी आहे. बेदाण्याला प्रति क्विंटल किमान १०००० तर कमाल २८९०० रुपये असा दर आहे.

गतसत्पाहापेक्षा चालु सप्ताहात गूळ बॉक्सची २४९६ क्विंटलने आवक वाढली आहे. गुळाला प्रति क्विंटल किमान ३३३७ कमाल ४१७५ रुपये असा दर मिळाला. परपेठ हळदीची १५३२८ क्विंटल झाली. गतसप्ताहाच्या तुलनेत चालु सप्ताहात ३१८२ क्विंटलने आवक कमी आहे. परपेठ हळीला प्रति क्विंटल किमान ९०५० तर कमाल १५७९५ रुपये असा दर होता. गुळाची भेलीची ४१३५ क्विंटल आवक झाली. गतसप्ताहाच्या तुलनेत चालु सप्ताहात २४९७ क्विंटलने आवक जास्त आहे. गुळाला प्रति क्विंटल किमान ३३३७तर कमाल ४१२६ रुपये असा दर मिळाला. राजापूरी हळदीची ५०११५ क्विंटल आवक झाली. गतसप्ताहापेक्षा चालु सप्ताहात राजापुरी हळदीची १०८० क्विंटलने आवक जास्त आहे. राजापूरी हळदीला प्रति क्विंटल किमान १३५६२ तर कमाल २११५० रुपये असा दर होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here