कोल्हापूर : गंगानगर इचलकरंजी येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे भवितव्य लांबणीवर पडले आहे. कारखान्याची निवडणक बिनविरोध झाली असल्याने कारखान्यावर प्रशासक नियुक्तीची कारवाई करू नये, याबाबत बाबासाहेब मगदूम यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्यावर आज, बुधवारी सुनावणी होत आहे.
कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांच्या नेतृत्वाखालील बिनविरोध निवडणूक रद्द करत केंदीय निवडणक प्राधिकरणाने नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली, पण यावर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रक्रियेवर हरकत घेण्यात आली. न्यायालयाने निवडणूक रद्द आणि नव्याने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत म्हणणे सादर करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाला दिले आहेत.