जागतिक साखर उद्योगात भारतीय साखरेला मिळणारे अनुदान चर्चेचा विषय बनला आहे. ब्राझिलियन सरकारने डब्ल्यूटीओला भारतीय साखर अनुदानांवरील विवाद निराकरण करण्यासाठी पॅनेल तयार करण्यास सांगितले. साखर सब्सिडी वैश्विक व्यापाराच्या नियमांशी विसंगत असल्याचा आरोप ब्राझ्रिलने केला आहे.
जागतिक व्यापारी संघटनेने ब्राझिल सरकारला याबाबत समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय साखरेची सबसिडी जागतिक बाजारपेठेच्या नियमांशी विसंगत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या समितीच्या अहवालानुसार दि. 22 जुलैला जागतिक व्यापारी संघटनेची बैठक घेण्यात येणार आहे.
भारतीय साखर गेल्या दोन-तीन वर्षांपासून वेगवेगळ्या अडथळ्यांना तोंड देत आहे आणि यामुळे या संकटातून बाहेर आणण्यासाठी सरकारने सॉफ्ट लोन योजनेसारख्या विविध उपाययोजना केल्या आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.