नवी दिल्ली : चीनीमंडी
केंद्र सरकारने साखरेची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) निश्चित केल्यामुळे आता साखरेच्या दरावरून होणारी सट्टेबाजी बंद झाली आहे. आता स्थानिक बाजारात व्यापार करणारे छोटे आणि मध्यम स्तरावरचे व्यापारी इतर खाद्य वस्तूंकडे वळले आहेत. भारतात गेल्या हंगामात साखरेचे बंपर उत्पादन झाले होते. त्यामुळे साखरेचा दर सातत्याने घसरत होता. त्याला रोखण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी जून महिन्यात साखरेची किमान आधारभूत किंमत निश्चित केली होती.
एमएसपी जाहीर करण्यापूर्वी भारतीय बाजारात साखरेच्या दरांमध्ये मोठी घसरण होत होती. एकावेळी साखरेचा दर २४ रुपये किलोपर्यंत खाली घसरला होता. त्याही पेक्षा खाली दर उतरण्याची भीती व्यक्त होत होती. त्यावेळी सरकारने साखर कारखान्यांना २९ रुपये किलो किमान आधारभूत किंमत निश्चित केली होती. यासंदर्भात ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोशिअशनचे अध्यक्ष प्रफुल्ल विठलानी म्हणाले, साखरेची एमएसपी निश्चित होण्यापूर्वी साखर व्यापाऱ्यांकडे २० लाखांपर्यंत स्टॉक असायचा. पण, आता साखर मुबलकप्रमाणात आहे. त्याची किमतही निश्चित आहे. या परिस्थिती व्यापारी स्टॉक करून ठेवण्यापेक्षा रोखीने व्यवहार करताना दिसत आहेत.
गेल्या काही वर्षांत साखरेचे उत्पादन कमी अधिक प्रमाणात असण्याचा आणि देशभरात समान भाव नसण्याचा फायदा सट्टेबाज घेत होते. आता ही सट्टेबाजी थांबली आहे. पुण्यातील विजय गुजराती यांचे कुटुंब १९२८ पासून या व्यवसायात आहे. ते म्हणाले, गेल्या वर्षभरात साखरेचा ट्रेडिंग व्हॉल्यूम खूप घटला आहे. आता आंम्ही गहू, ज्वारी, चहा, अशा इतर खाद्य वस्तूंची विक्री करतो. ज्वारी आणि इतर धान्य किंवा खाद्य वस्तूंच्या किंतमींवर दुष्काळाचा परिणाम होताना दिसतो त्यामुळे साखरेपेक्षा त्याचा व्यापार अधिक फायदेशी आहे.
दरम्यान, देशात सगळीकडे एकच दराने साखर विक्री होत असल्यामुळे महाराष्ट्रातील साखर व्यापाऱ्यांची उत्तर भारतातील बाजारपेठ हातून गेली आहे. विजय गुजराती म्हणाले, आम्ही पूर्वी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात साखर विक्री करत होतो. आता हा व्यापार जवळपास संपुष्टात आला आहे. सरकारने निर्यात वाढवण्यासाठी खूप प्रोत्साहन दिले. जे व्यापारी देशांतर्गत बाजारापेक्षा निर्यातीवर लक्ष ठेवून होते. त्यांना फायदा झाला. एमएसपी सक्ती असली तरी, अनेक व्यापारी किंवा साखर कारखाने त्याच्या खालच्या दराने साखर विक्री करत आहेत, अशी माहिती मुंबईतील एका किरकोळ व्यापाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.