आमदार बच्चू कडू यांनी पुकारले शेतकऱ्यांसाठी रणशिंग

सातारा : प्रहार संघटनेच्या माध्यमातून अपंगांसाठी लढा देणारे आमदार बच्चू कडू यांनी साखर कारखानदारांच्या विरोधात रणशिंग फुंकण्याचे संकेत दिले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांनी आता संघर्षासाठी तयार रहावे, असे आवाहन त्यांनी सातारा जिल्ह्यात केले आहे. प्रहार संघटनेच्या संवाद यात्रे दरम्यान त्यांना पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांवर टीका केली. साखर कारखाने हे आमदार खासदारांच्या हातात असल्याने केंद्र सरकारकडून त्यांच्यावर ऊस दरासाठी दबाव टाकला जात नाही. त्यामुळे त्याविरोधात आवाज उठवण्याचा इरादा आमदार बच्चू कडू यांनी बोलून दाखवला.

आमदार बच्चू कडू म्हणाले, ‘साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना कितीही लुटले तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही. कारखाने सगळे नेत्यांच्या हातात आहे. त्यामुळे कारवाई होत नाही. सध्या केंद्र सरकार स्वच्छता अभियानावर कोट्यवधी रुपये खर्च करत असले तरी हे सगळे नाटक आहे. केंद्राने शेतकऱ्यांना कोणतीही मदत केलेली नाही. शेतकरी वंचित असल्याने पुढची लढाई आता साखरेच्या दरासाठी असणार आहे. केंद्र सरकार सध्या शेतकऱ्यांना दीड पट हमी भाव देण्याची चर्चा करत आहे. तर, सरकारने ऊस उत्पादकांना ३ हजार ७०० रुपये भाव द्यावा.’

एकेकाळी पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊस दरासाठी आंदोलन केले होते. ऊस दराच्या आंदोलनातूनच शेट्टी यांचे नेतृत्व उदयास आले. आमदार कडू यांनी यापूर्वी अपंगांसाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलने केली आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एकदा आमदार कडू यांनी अपंगांच्या सायकली घेऊन लक्षवेधी मोर्चा काढला होता. आता आमदार कडू ऊस दराच्या आंदोलनात उतरण्याची शक्यता दिसत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here