“साखर विक्री करून शेतकर्‍यांचे पैसे द्या”

सोलापूर: साखर विक्री करून एफआरपीनुसार शेतकर्‍यांचे पैसे द्या, अशा सूचना शासनाने साखर कारखान्यांना दिल्या आहेत. सध्या राज्यातील 90 कारखान्यांंकडे 1170 कोटी रुपये इतकी रक्कम अडकली आहे.

राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एफआरपी थकविणार्‍या कारखान्यांना नोटिसा देणे व आरआरसी कारवाईची प्रक्रिया करण्यास जानेवारीपासूनच सुरुवात केली होती. त्यामुळे अनेक कारखान्यांनी कारवाई टाळण्यासाठी शेतकर्‍यांचे पैसे दिले आहेत. साखर विक्री करून, इथेनॉलच्या पैशातून किंवा वीज विक्री करून शेतकर्‍यांचे उसाचे पैसे देण्याची सवलत कारखानदारांना दिली होती. त्याप्रमाणे राज्यातील 105 साखर कारखान्यांनी 15 जूनपर्यंत एफआरपीनुसार संपूर्ण रक्कम शेतकर्‍यांना दिली आहे. जानेवारी, फेब्रुवारी व मे महिन्यात सुनावणी घेऊन एफआरपी देण्याची संधी दिल्यानंतरही शेतकर्‍यांचे पैसे देण्यासाठी हयगय करणाऱ्या राज्यातील 77 साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here