सोलापूर : राज्यातील 75 साखर कारखान्यांकडे एफआरपीप्रमाणे 825 कोटी 75 हजार रुपये थकबाकी असून, यापैकी सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कारखान्यांकडे 395 कोटी 28 लाख रुपये अडकले आहेत. काही कारखान्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम दिली असून, केंद्र व राज्य शासनाकडून येणारी रक्कम थकल्याने संपूर्ण एफआरपी देऊ शकत नसल्याचे सांगितले जाते. साखर कारखाने बंद होऊन पाच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला तरीही शेतकर्यांच्या उसाचे पैसे मात्र मिळाले नाहीत.
राज्यातील 195 साखर कारखान्यांनी मागील वर्षी गाळप हंगाम घेतला होता. या कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाचे एफआरपीनुसार 23 हजार 173 कोटी रुपये शेतकऱ्यांचे देणे आहेत. यापैकी 22 हजार 367 कोटी रुपये दिले असून 15 जुलैपर्यंत 826 कोटी रुपये शेतकऱ्यांचे देणे आहे. 120 साखर कारखान्यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे एफआरपी दिली असून 75 कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देणे आहे. 80 टक्क्यांपेक्षा अधिक एफआरपी 56 कारखान्यांनी दिली असून, 14 कारखान्यांनी 60 टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम दिली आहे. पाच कारखान्यांनी 60 टक्क्यांपर्यंत रक्कम दिली आहे.
साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, साखरेला उठाव नसल्याने एफआरपी थकली आहे. शासनानेच शेतकर्यांचे पैसे देण्यास सवलत दिली आहे. मागील 15 दिवसात काही रक्कम शेतकर्यांना दिली आहे. एफआरपीच्या दोन टक्के रक्कम देणे आहे. ती कारखान्याकडून शेतकर्यांना देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.