श्रीलंकेत उस हे सर्वात मोठे पिक घोषित करण्यासाठी श्रीलंका सरकारला कॅबिनेटची मान्यता मिळाली आहे. मंत्री नवीन दिसानायके यांनी देशाला असणार्या साखरेच्या आवश्यकतेला पूर्ण करण्यासाठी आणि साखर उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रस्ताव सादर केला होता.
श्रीलंकेच्या साखरेची वार्षिक विक्री 670,000 मेट्रिक टन आहे आणि ही आवश्यकता 91 टक्के आयातीमुळे पूर्ण होते. आणि साखरेची आवश्यक्यता पूर्ण करण्यासाठी दरवर्षी जवळजवळ 350 मिलियन अमेरिकन डॉलर खर्च होतात.
घरगुती साखरेची आवश्यकता 2020 पर्यंत 700,000 मेट्रीक टनापर्यंत वाढेल, अशी आपेक्षा आहे. या आवश्यकतेला पूर्ण करण्यासाठी मानेरगाला, बटियाकोला, किलिनोच्ची, अनुराधापुरा, त्रिनकोमाली, अम्पारा, बादुल्ला आणि पोलोनारुवा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 104,000 हेक्टर जमिनीची पाहणी केली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.