बँक ऑफ चायनाला भारतात नियमित बँकिंग सेवा देण्याची परवानगी मिळाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम, 1934 च्या दुसर्या परिशिष्टात बँक ऑफ चायना लिमिटेड चा समावेश करण्यात आला आहे. भारतातील सर्व वाणिज्य बँका दुसर्या परिशिष्टाअंतर्गत येतील आणि त्यांना आरबीआयच्या निकषांचे पालन करावे लागेल.
‘जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड’ ला सुद्धा दुसर्या परिशिष्टात समाविष्ट केले गेले आहे. नॅशनल ऑस्ट्रेलिया बँकेला बँकिंग नियमन कायद्याअंतर्गत बँक कंपनीच्या सूचीतून वगळण्यात आले असल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.