पोंडा :
संजीवनी साखर कारखान्याचा जगण्यासाठी संघर्ष सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला कारखाना बंद पडल्याने चोरीच्या घटना वाढत आहेत . गेल्या १५ दिवसात चोरीच्या दोन घटना समोर आल्या आहेत आणि ३ लाख रुपयांपेक्षा अधिक सामान चोरीला गेले आहे.
चोरीच्या घटनेनंतर, पोंडा पोलीसांकडून चोरांचा तपास सुरु होता. चोरीच्या प्रयत्नात असतानाच अखेर त्यांना रंगे हात पकडले. पोलीसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपींना कामगारांनी कारखाना परिसरात रंगेहात पकडले . आरोपी कारखान्यात दाखल होताच कामगारांनी त्यांना पकडले आणि आमच्या ताब्यात दिले . या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे .
यातील आरोपी असे, कृष्णा इंगल (३५), राजेश गुप्ता (४५), सुनील गणाचारी (३०) आणि सुरेश यादव (४०) . यांच्याकडे चोरीचा माल सापडलेला नाही. ऊसाची अनुुुपलब्धता आणि काही कारणांमुळे कारखान्याचे १०१ .२२ करोड रुपयाचे नुकसान झाले आहे . कारखाना चालू ठेवण्या्यासंदर्भातील व्यवहार्यतेच्या अध्य्ययनानंतर सरकार पुढचा निर्णय घेईल .
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.